Dehuroad Crime News : ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेची ATM बदलून 16 हजार रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचे ATM हातचलाखीने बदलले व ATM मधून 16 हजार रूपये काढून महिलेची फसवणूक केली आहे. आळंदी रोडवरील देहुगाव बाजारासमोरील अॅक्सिस बँकेच्या ATM मध्ये रविवारी (दि.13) हा प्रकार घडला.

मयुरी गोविंद सुर्यवंशी (वय 22, रा. देहु आळंदी रेड, देहुगाव) यांनी याप्रकरणी रविवारी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुरी या अॅक्सिस बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे असलेल्या तीन अनोळखी इसमांनी हातचलाखीने फिर्यादी यांचे ATM बदलून त्याद्वारे 16 हजार रूपये काढले. असे फिर्यादीत नमूद आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.