Kundamal News : इंद्रायणीत पडलेल्याला मित्राला वाचवायला गेलेलाच वाहून गेला

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील महाविद्यालयाचे काही विद्यार्थी कुंडमाळा येथे फिरायला गेले असता अफराज शेख (वय19) या तरुणाचा पाय घसरून पाण्यात पडला होता पण त्याला वाचवायला त्याचा मित्र राजकुमार जयस्वालने पाण्यात ऊडी मारली.पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाय घसरून पडलेला शेख हा दगडाला धरुन उभा राहीला पण वाचवायला गेलेला राजकुमार मात्र वाहून गेला. ही घटना अंदाजे सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान घडली.

यावेळी बजरंग दल व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचेचे कार्यकर्ते तिथे जवळच असल्यामुळे त्यांना अफराज शेखचा जिव वाचवण्यात यश आले.सागर भेगडे, मुन्न अरसुळे, राहुल इंगळे व मोक्षधाम यांच्या टिमला हे यश आले आहे.  तर दुसर्या मुलाला शोधण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांसह तळेगाव दाभाडे नगर परिषदेची टीम वाहून गेलेल्या मुलाला शोधण्यासाठी काही वेळात पोहचली व शोधकार्य सुरु केले.

आज वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे, तसेच संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन टिमचे अध्यक्ष गणेश निसाळ व सदस्य

विनय सावंत, सत्यंम सावंत, सुरज शिंदे, निनाद काकडे, ओंकार कालेकर, गणेश गायकवाड, दक्ष काटकर, भास्कर माळी, विकी दौंडकर तसेच तळेगाव दाभाडे नगरपरीषदचे अक्षय घोडेकर, धीरज शिंदे, गणेश जवळकर, अकाश ओव्हाळ व स्थानिक नागरीक सायंकाळी सहापर्यंत शोधकार्य सुरु होते पण त्या मुलाला शोधण्यात यश आले नाही. अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले. उद्या शुक्रवारी पुन्हा शोधकार्य चालू करु, असे संस्थेचे आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.