Pune News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ (मुंबई दिशेने) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने दिनांक 26 रोजी करण्यात येणार आहे.या कारणास्तव दुपारी 12.00 ते 14.00  या कालावधीत वाहतूक किवळे ते देहु रोड मार्ग (राष्ट्रीय महामार्ग 48) सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी  मार्गाचा वापर करावा, तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा  दुरध्वनी  क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.