Pune : वारजे येथे नूतन मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा

एमपीसी न्यूज – राजयोग प्रतिष्ठान श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळातर्फे नूतन मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला. राजयोग सोसायटी वारजे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी 10 ते 12 कलशाचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 ते 3 धार्मिकविधी, दुपारी 4 वा. कलशारोहण प. पू. चिदानंद स्वामीजी (कावेरी मठ कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी 5 ते 6 चिदानंद स्वामी यांनी प्रवचन दिले. सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 ह. भ. प. गोविंद महाराज गोरे (भागवताचार्य आळंदी) यांचे हरि कीर्तन झाले. रात्री 9 वा. महाप्रसाद पार पडला. या सर्व कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. राजयोग भजनी मंडळातर्फे या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपाली धुमाळ, ह. भ. प. धर्मराज महाराज हांडे यावेळी उपस्थित होते. मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.

HB_POST_END_FTR-A2
You might also like