Kusur : कोल्हा विहिरीत पडल्याने कुसूर गावाचा पाणी पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज : कोल्हा विहिरीत पडल्याने जुन्नर तालुक्यातील कुसूर (Kusur) गावाचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. एक भारतीय सोनेरी कोल्हा कुसूर गावातील 50 फूट खोल विहिरीत शुक्रवारी पडला होता. ह्या विहिरीतून पुर्ण गावाला पाणी पुरवठा होतो.
सकाळी ग्रामस्थांनी हे पाहिले व वन विभागाला कळवले. वन विभागाचे व वाइल्डलाईफ एसओएसची पथके गावामध्ये गेल्यावर त्यांनी पाहिले की विहिरीमध्ये कोल्हा मोटर पंपच्या एका पाईपला लटकला होता. तो थकल्याने पाईपला पकडून लटकला होता व स्वतःला बुडण्यापासून वाचवत होता.

विहिरीमध्ये (Kusur) एक लांब काठी सोडण्यात आली. ज्याच्या मदतीने कोल्हा बाहेर आला. निखिल बांगर, पशु वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, “खुल्या विहिरी वन्य प्राण्यांना घातक आहेत. कारण त्यामध्ये ते पडून जखमी होतात व कधी कधी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू देखील होतो. विशेषतः पाण्याने भरलेल्या विहिरी जास्त घातक आहेत कारण त्यामध्ये वन्य प्राणी पडल्यावर बुडून मृत्यू होण्याची शक्यता असते. वेळेवर कळल्यामुळे सोनेरी कोल्ह्याला यशस्वीपणे विहिरीतून बाहेर काढुन त्याचा जीव वाचवण्यात आला.”
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अनुसूचित 2 अन्वये सोनेरी कोल्हा संरक्षित प्राणी आहे. तो सर्वभक्षक असून छोटे सस्तन प्राणी, किडे, ससे, मासे, पक्षी व फळे खातात. तसेच, या खाद्याच्या शोधात सोनेरी कोल्हा मानवी वस्तीत येतात.
भारतीय कोल्हा: 
भारतीय कोल्ह्याची उंची 38-43 सेंमी.; डोक्यासकट शरीराची लांबी 60-75 सेंमी.; शेपूट 20-27 सेंमी.; वजन 8-11 किग्रॅ. असते. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात. कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले, तरी लांडगा जास्त उमदा दिसतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.