Crime News : पुण्यात कॅनॉलमध्ये आढळला वृद्धाचा मृतदेह

एमीपीसी न्यूज – पुण्यातील धायरी येथील पाण्याच्या कॅनॉलमध्ये एका 67 वर्षीय वृध्दाचा मृतदेह अढळून आला आहे. ही घटना रविवारी (दि. 23) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.

भानुदास लाळे (वय 67 रा. वडगाव बुद्रुक) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

सकाळी नागरिकांनी सिंहगड रोड, धायरी फाटा, सणस शाळेजवळील कॅनोलमधील पाण्यात तरंगणारा मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढला.यावेळी मृताची ओळख पटली असता मृत हे मागील दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज यावेळी पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.