Chakan : पती कंपनीत कामाला गेल्यानंतर पत्नी तीन लेकरांसह बेपत्ता

एमपीसी न्यूज – पती कंपनीत कामाला गेल्यानंतर सव्वीस वर्षीय विवाहिता येथून गेल्या दीड महिन्यांपासून तिच्या तीन लहान लेकरांना बरोबर घेऊन निघून गेली आहे. तेव्हापासून ते चौघेजण घरी परतलेले नसून अद्याप ते सर्वजण बेपत्ता आहेत.

रेश्मा काशिनाथ कंबार (वय – २६ वर्षे) ऐश्वर्या काशिनाथ कंबार ( वय – १० वर्षे), श्रद्धा काशिनाथ कंबार (वय – ६ वर्षे) व श्री काशिनाथ कंबार ( वय – ५ वर्षे, सर्वजण सध्या रा. नागेश्वर मंदिराजवळ, मोशी, ता. हवेली), अशी बेपत्ता झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. रेश्मा कंबार यांचे पती काशिनाथ राणबा कंबार ( वय – ३१ वर्षे,) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा हिचे पती काशिनाथ हे मंगळवारी (दि. ८ ऑक्टोबर) सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान चाकण येथील एका कंपनीत कामाला गेले होते. त्यानंतर रेश्मा ही तिची मुले ऐश्वर्या, श्रद्धा व श्री यांना बरोबर घेऊन निघून गेली आहे. काशिनाथ हे सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कामावरून घरी आल्यानंतर वरील प्रकार समजला. त्यामुळे ते सर्वजण बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.