Nighoje : निघोजे येथील कंपनीत सव्वातीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – निघोजे येथील (Nighoje) पॉलीरब एस्ट्रोजन्स या कंपनीत चोरी झाली. चोरट्यांनी तीन लाख 23 हजार 710 रुपये किमतीचे रबरचे कच्चे पार्ट चोरून नेले. ही घटना 29 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

अभिमान दामोदर वाघमारे (वय 44, रा. निघोजे, ता. खेड) यांनी 10 जानेवारी रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; वृद्ध महिलेचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने कंपनीच्या स्टोरेज रूम मधील मागच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. स्टोरेज रूम मधून एक हजार 933 किलो वजनाचे तीन लाख 23 हजार 710 रुपये किमतीचे (Nighoje) रबरचे कच्चे पार्ट चोरून नेले. हा प्रकार 27 डिसेंबर रोजी रात्री आठ ते 29 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत घडला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.