Thergaon : संपत्तीच्या कारणावरून पुतण्यास पाजले विषारी औषध

एमपीसी न्यूज – संपत्तीच्या कारणावरून चुलत्याने पुतण्याला (Thergaon) विषारी औषध पाजले. या प्रकरणी चुलत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 10) रात्री थेरगाव येथे घडली.

गणेश दादू लोंढे (वय 26, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या चुलत्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त यांच्या अंतर्गत बदल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचा दीर आरोपी गणेश लोंढे यांच्यात संपत्तीच्या कारणावरून वाद सुरू आहेत. त्या कारणावरून गणेश लोंढे यांनी फिर्यादी यांच्या पाच वर्षीय मुलाला कुत्र्यास जंत मारण्यासाठी पाजण्याचे (Thergaon) डी वॉर्मिंग नावाचे औषध पाजले. त्यामुळे फिर्यादी यांच्या पाच वर्षीय मुलाला जुलाब आणि उलटीचा त्रास झाला. यामध्ये आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाच्या शरीरास अपाय व दुखापत करण्याचा प्रयत्न केला व हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.