Thergaon : खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे परदेशी पाहुण्या जर्मन महिला शिरीन टिमरमॅन व त्यांचे पती टिमरमॅन हे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मेजर प्रताप भोसले, अविनाश गराडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड सतीश गोरडे, संचालक अशोक पारखी, संस्थेचे संचालक आसाराम कसबे, गतीराम भोईर, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, महिला पालक व खिंवसरा पाटील शिक्षण संकुल मधील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

या कार्यक्रमात धामणे गावच्या नवनिर्वाचित सरपंच शीतल गराडे, राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या महासचिव आझाद हिंद फौज या विषयावर पीएचडी केलेल्या व सैनिकांसाठी काम करणाऱ्या शुभांगी सरोटे, व्याख्यात्या वैशाली इतराज, आवाज माझा या चॅनेलवर निवेदिका म्हणून काम करणाऱ्या स्नेहा पाठक, शाळा व संस्थेसाठी झटणाऱ्या शिक्षिका सुनीता घोडे, शाळेला मदत मिळवून देणाऱ्या सविता पोळ, लेखिका व प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या संचालिका नीता मोहिते या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इंडियन टॅलेंट परीक्षेत इयत्ता पहिलीतील राज्यात नववा आलेला वैभव बर्डे व बारावा आलेला केतन सांगळे या दोन विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मातांचाही सन्मान करण्यात आला.

शिरीन टिमरमॅन म्हणाल्या की, ज्याप्रमाणे पक्षाला दोन पंख असतात व एक पंख तुटला तरी तो उडू शकत नाही. त्याप्रमाणे पुरुष व स्त्री हे दोन्ही पंखांप्रमाणे आहेत. पुरुष व स्त्री दोन्ही जीवनात खूप महत्त्वाचे असतात. मुलगी, आई, बहीण, बायको, इतर स्त्रिया यांचा आदर करा. बाहेरच्या देशात प्रेम कमी व शिस्त जास्त आहे आणि भारतात प्रेम खूप आहे. जर सर्वांनी घरी, बाहेर, कामाच्या ठिकाणी शिस्त पाळली तर भारत सुद्धा खूपच प्रगती करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अॅड सतीश गोरडे यांनी साध्या मराठी शाळेत शिकून सर्वोच्च पदावर गेलेल्या महिलांचा उल्लेख करून या महिलांचा आदर्श घ्या व चांगला नागरिक बना असा संदेश दिला.

संस्थेचे संचालक आसाराम कसबे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या संचालिका नीता मोहिते म्हणाल्या की, निर्माण करण्याची शक्ती स्त्रीमध्येच अाहे. हे स्त्रीत्व सर्व स्त्रियांनी स्वीकारून आपले जीवन अधिक फुलवावे अशा शुभेच्छा दिल्या. शुभांगी सरोटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर हांडे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा आखाडे यांनी तर आभार पुष्पा जाधव यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय खिंवसरा पाटील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी करून दिला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like