Theur : थेऊर मध्ये श्री चिंतामणी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज :  माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी निमित्त दि. 9 रोजी पहाटे आनंद आगलावे यांनी श्री चिंतामणी ची पूजा केली. तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने श्रींची (Theur) महापूजा करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे आनंद महाराज तांबे उपस्थित होते. पहाटे पासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

देवस्थानच्या वतीने भविकांसाठी मंदिराबाहेर दर्शनबारी व मंडप व्यवस्था करण्यात आली होती.व भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी हिरव्या जाळीचे आच्छादन मंडपा वर बांधण्यात आले होते.व दक्षिणेकडील रस्त्यावर सुद्धा दर्शनबारी व मंडप व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थान च्या वतीने दुपारी भाविकांना खिचडी व चिवडा वाटण्यात आला.

Alandi News : आळंदी ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर व जागरूक पालक-सदृढ बालक या अभियानाचा शुभारंभ

प्रतिवर्षी प्रमाणे ह भ प एकनाथ महाराज तारू,ह भ प रुक्मिणीताई तारू व चिंतामणी महाराज तारू यांच्या तर्फे श्री चिंतामणी जन्मोत्सव व सप्ताह साजरा करण्यात येत आहे. (Theur)त्या अंतर्गत दि.9 रोजी स्वयंभू चिंतामणी भगवंत तसेच  महासाधू मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज देव यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सायं.7 ते 9 या वेळेत जन्मोत्सव कीर्तन झाले.तद्नंतर पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

चंद्रोदया नंतर श्रींचा छबिना निघाला व त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.लोणीकळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला  होता.ग्रामपंचायतीच्या वतीने पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.सर्व व्यवस्थेवर विश्वस्त ह भ प आनंद महाराज तांबे लक्ष ठेवून होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.