Today’s Horoscope 10 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 February 2023
वार – शुक्रवार.
10.02.2023.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- साधारण दिवस
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – हस्त 24.28 पर्यंत.
चंद्र राशी – कन्या.
—————————————-
मेष – (शुभ रंग- मरून)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील आज तब्येत थोडी नारमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील वाद दुपारनंतर सौम्य होतील.

वृषभ (शुभ रंग – पांढरा)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ लाभेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सोडवावे लागतील. आज हितशत्रू तुमच्या चुका शोधत आहेत. सतर्क रहा.

मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

सिंह (शुभ रंग- लाल)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनासारखा खर्च करू शकाल. कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील.

कन्या (शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न जमणारी कामे तुम्ही करून दाखवाल. आज व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

तूळ (शुभ रंग – डाळिंबी)
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी) – Today’s Horoscope 10 February 2023
नोकरीच्या ठिकाणी काही मनासारख्या घटना घडतील सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम पाळा.

धनु (शुभ रंग – चंदेरी)
नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कामाला लागा. वडील आज योग्य सल्ले देणार आहेत.

मकर (शुभ रंग- मोरपंखी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचा मोह टाळा. काही फसव्या संधी येतील. स्वतःवर संयम असू द्या.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातूनच मनःशांती मिळणार आहे.

मीन (शुभ रंग – पांढरा)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकलेली बरी. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जरा जपून करा. भागीदाराच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.