Chikhali : पोलीस असल्याची बतावणी करून दोघांना लुटले

एमपीसी न्यूज – ‘तूम गांजा पिते हो क्या, तुम नशा करते हो क्या’ असे म्हणून तरूणांच्या हातांचा वास घेतला. ‘मै पोलीसवाला हूँ, तुम्हारे जेब मे जो है ओ बाहर निकालो, मुझे चेक करनेका है,’ असे म्हणून तरूणाला थोबाडीत मारून त्याच्या आणि मित्राकडील तीन मोबाईल, रोकड असा 52 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना शाहूनगर येथे गुरूवारी (दि.28) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी महमद नासमुल अहमद लष्कर (वय-18, रा कुदळवाडी, चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच-14, एच एक्स 3476) या क्रमांकाच्या दुचाकी चालक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी फिर्यादी आणि त्याचा मित्र शाहूनगरकडे जात होते. यावेळी विरूद्ध दिशेने पिवळ्या ज्युपिटरवर आलेल्या आरोपीने फिर्यादीला अडविले. ’तूम गांजा पिते हो क्या, तुम नशा करते हो क्या’ असे म्हणून तरूणांच्या हातांचा वास घेतला. ’मै पोलीसवाला हू, तुम्हारे जेब मे जो है ओ बाहर निकालो, मुझे चेक करणेका है,’ असे म्हणून तरूणाला थोबाडीत मारून त्याच्या आणि मित्राकडील तीन मोबाईल, रोकड असा 52 हजार 300 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुमच्याकडे पाहून घेऊन अशी धमकी देऊन पिस्तूल दाखविले. फौजदार बागुल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.