Bhosari : हजारो सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर; आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजनेसारखा महत्वकांक्षी प्रकल्प भोसरी विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आला आहे. या माध्यमातून हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपले हक्काचे घर मिळणार आहे, अशी माहिती घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर धुरी यांनी दिली.

सुधाकर धुरी म्हणाले, भोसरी विधानसभा मतदार संघात च-होली येथे 1 हजार 482, रावेत येथे 850 आणि बो-हाडेवस्ती येथे 1 हजार 200 सदनिकांचा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या  पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात राहण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

चिखली येथील घरकुल प्रकल्पांमध्ये अनेक सुविधा साकारल्या जात आहेत. त्यामध्ये दवाखाना, क्रीडांगण, सांस्कृतिक भवन, भाजी मंडईचे काम प्रगतिपथावर आहे. शहरे वाढत आहेत. वाढत्या शहराची लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या निवासाची सोय करणे गरजेचे आहे. यासाठी आमदार महेश लांडगे यांच्यासारख्या नेतृत्वाची मोठी मदत होत आहे, असेही धुरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.