Pune Crime News : ‘लग्नात ठरलेल्या वस्तू जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मूल होऊ देणार नाही’ आडमुठ्या पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्न होत असताना सोनं कमी घातले, ब्रेसलेट घातले नाही असे सांगून लग्न मंडपामध्ये भांडण करणाऱ्या आणि जोपर्यंत या सर्व वस्तू मिळत नाही तोपर्यंत मूलबाळ होऊ देणार नाही असे म्हणून पत्नीला दररोज गोळ्या खायला लावणाऱ्या पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

ओमकार सतीश जाधव (वय 32) स्वाती सतीश जाधव (वय 48) आणि करण (वय 29) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. मार्च ते सप्टेंबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 11 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झालेल्या दिवसापासून आरोपी ओमकार जाधव हा विवाहितेला त्रास देत होता. लग्नात नवरदेवाला सोनेच कमी घातले, ब्रेसलेट घातले नाही म्हणून त्याने भर लग्न मंडपामध्ये भांडण केले होते. त्यानंतर लग्नात ठरलेल्या वस्तू जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत मूलबाळ होऊ नये यासाठी दररोज तो फिर्यादीला गोळ्या खायला लावत असे. गोळी न खाल्ल्यास सोडचिठ्ठी देऊ अशी धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

काऊंटडाऊन दहावी! भाग 10 – Tricks to score higher in SSC English Exam – Santosh Khatal. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.