PCMC News : ‘मानधना’वरील शिक्षकांच्या 285 जागांसाठी 3 हजार अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 285 शिक्षकांची कमरता असून तात्पुरत्या स्वरूपात गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही पदे सरळ सेवा प्रवेशाने सहा महिन्यांसाठी मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहेत.(PCMC News) यासाठी दिलेल्या मुदतीत तब्बल 3 हजार 22 शिक्षकांचे अर्ज पालिकेच्या शिक्षण विभागाकडे आल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संदिप खोत यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 शाळा आहेत. या शाळांमध्ये 18 हजार 893 मुले तर 20 हजार 737 मुली शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 137 शिक्षक आणि 68 मुख्याध्यापक आहेत. मात्र, या शाळांमध्ये तब्बल 285 शिक्षकांची कमतरता होती. प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी अस्थापनेवर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही पदे सरळ सेवा प्रवेशाने सहा महिन्यांसाठी भरण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने नुकतीच जाहिरात प्रकट करून इच्छूकांचे अर्ज मागविले होते. दिलेल्या मुदतीमध्ये पदवीधर शिक्षक पदासाठी 1 हजार 310 तर सहाय्यक शिक्षक पदासाठी 1 हजार 714 अर्ज आले आहेत.

Pune Crime : पत्नी अन तिच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

याबाबत माहिती देताना उपायुक्त खोत म्हणाले, 285 जागांसाठी 3 हजार 24 अर्ज आले आहेत. आलेल्या अर्जदारांमधून पात्र अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.(PCMC news) गुणवत्तेननुसार शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. तसेच काही शिक्षकांची निवड केली केल्यानंतर ते सेवेत रूजू होत नाहीत. त्यामुळे एका जागेसाठी दोन जणांची निवड करण्यात येणार आहे. निवड होणाऱ्या शिक्षकांना 20 हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.