Pune Crime : पत्नी अन तिच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी फ्लॅटसाठी शिविगाळ करत हाताने मारहाण करून त्रास दिल्याने मानसिक संतुलन बिघडल्याने पतीने आत्महत्या केली.(Pune Crime) मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पत्नीसह तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ झा (वय 31) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी नंदिनी झा, पत्नीचा भाऊ रवी प्रदीप झा, पत्नीचे वडील प्रदीप झा यांच्यासह चार जणविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलाची आई शामल किशोर झा यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Auto strike : पुणे व पिंपरी-चिंचवड येथील रिक्षांचा आज पुन्हा संप

अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपींनी पैशासाठी आणि बेंगलोर येथील फ्लॅट घेण्यासाठी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली..(Pune crime) पैसे देत नसल्याने फिर्यादीच्या मुलाला अनेक मार्गानी त्रास दिल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. याच त्रासातून त्याने चार डिसेंबर रोजी आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबीय विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस अधिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.