Pune News : पुण्यात दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण

एमपीसी न्यूज – नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम आता माहाराष्ट्र राज्यात दिसत असून पुढील दोन दिवस (Pune News) मंगळवारी (दि.13) व बुधवारी (दि.14) दोन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून काही भागात विजांच्या पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रावरही चक्रीवादळाचा परिणाम झाला असून 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य  महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

PCMC News : ‘मानधना’वरील शिक्षकांच्या 285 जागांसाठी 3 हजार अर्ज

या अवकाळी पावसामुळे पिकांवर याचा दुष्परीणाम होणार असल्याने बळीराजा मात्र हैराण झाला आहे. तर अचानक येणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांचीही पुरती धवपळ उडत आहे.(Pune News) मात्र या ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला असून पुण्याचे कमाल तापमान हे 30 अंश सेल्सीयस वर तर किमान तापमान हे 12 अंश सेल्ससियस वर पोहचले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.