pimpri : गावी जाण्यासाठी सुटीनिमित्त वल्लभनगर आगारात प्रवाशांची आरक्षण केंद्रावर गर्दी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारातून उन्हाळी सुट्टीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  गावी जाण्यासाठी  आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. जादा गाड्यांचे ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले आहे. पुढील आठवडाभरात आरक्षणाचे प्रमाण वाढेल, अशी माहिती आगारव्यवस्थापक प्रमुख एस.एन. भोसले यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड शहरातील औद्यागिक परिसरातील विविध कंपन्या, कार्यालय व शाळा महाविद्यालय यांना सुट्या असल्यामुळे अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह आपल्या मूळ गावी जात असतात. यामुळे एसटी बसेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असल्यामुळे अनेकांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. यामुळे अनेक नागरिक सध्या वल्लभनगर आगारामध्ये आरक्षाणासाठी मोठी गर्दी करीत आहेत. यामुुळे आरक्षण केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी होत आहे.

वल्लभनगरआगारांतून कोल्हापूर, लातूर, चिपळूण, गोंदवले आणि नाशिक , अलिबाग, सातारा, सांगली. कराड, मुंबई,  कोकण, दिव्यागर आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची आरक्षण केंद्रावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून आरक्षणाच्या दोन खिडक्या सुट्टीच्या कालावधीत सुरु कराव्यात अशी मागणी प्रवाशी करीत आहे. शाळांच्या परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. तर महाविद्यालयांच्या परीक्षाही आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत.  त्याचप्रमाणे या बसस्थानकांवर उपलब्ध प्रवाशांची संख्या पाहून बस वाढविल्या जातील, असे  व्यवस्थापकांनी  सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.