Today’s Horoscope 03 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 03 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- रविवार.

तारीख – 03.03. 2024.

शुभाशुभ विचार- 16  प. चांगला.

आज विशेष – भानु सप्तमी, कालाष्टमी.

राहू काळ – सायंकाळी 4.30  ते 06.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – अनुराधा 15.55 पर्यंत नंतर ज्येष्ठ.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————–

मेष – ( शुभ रंग – तांबडा)

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध राहा. नवीन झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका.

वृषभ – ( शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ राहील.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम )

आज कोणतीच गोष्ट सहज शक्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची दाट शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

कर्क – ( शुभ रंग – पिस्ता)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी प्रिय मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

सिंह -( शुभ रंग – लाल)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)

शेजाऱ्यांशी झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. आईचे मन दुखावू नका. आज वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.

तूळ- ( शुभ रंग- भगवा)

आज संध्याकाळी अनपेक्षित पणे काही येणी वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. खर्च कितीही जरी वाढला तरी पैशाची कमतरता जाणवणार नाही.

वृश्चिक -( शुभ रंग – आकाशी)

आज अति उत्साहाने तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगलाच प्रभाव पडेल.

धनु – (शुभ रंग- जांभळा) 

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही करू नका. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी होईल. आज संध्याकाळी एखादी हरवलेली वस्तू सापडेल.

मकर-  (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ होईल.

कुंभ – (शुभ रंग- अबोली)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त तुमच्या कर्तव्यालाच प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांना वेळ देणे आज जरा अवघडच होईल.

मीन -( शुभ रंग- निळा)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.