Today’s Horoscope 07 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  सोमवार.  ….. ​दि​.  07 डिसेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार –०७ नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – कालाष्टमी.
  • राहू काळ – सकाळी ०७.३०  ते ०९.००.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मघा १४.३२ पर्यंत नंतर पूर्वा.
  • चंद्र राशी – सिंह.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष ( शुभ रंग -मोतिया )

व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील.  स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

वृषभ –( शुभ रंग -सोनेरी )
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. भावंडांमधील गैरसमज दूर होतील.

मिथुन ( शुभ रंग -केशरी )

कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. आज काही महत्वाची मेल्स येतील

.

कर्क( शुभ रंग- हिरवा )

वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज खिशात पैसाही खेळता असेल. एखाद्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी थोडे बिनसणार आहे.

सिंह – ( शुभ रंग- मरून )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल. अति स्पष्टवक्तेपणा ने काही नाती दुरावतील.

कन्या ( शुभ रंग – डाळिंबी )

आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. आज जमा खर्चाचा ताळमेळ साधणे कठीण जाईल.

तूळ  ( शुभ रंग – चंदेरी )

दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येय प्राप्ती कडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.

धनु ( शुभ रंग- जांभळा)

आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देव दर्शनाची ओढ लागेल.

मकर – (शुभ रंग गुलाबी)

आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. आज पत्नी जे म्हणेल त्याला होच म्हणा.

कुंभ ( शुभ रंग – मोरपिशी)

आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.

मीन  (  शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. आज स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.