Maharashtra Corona Update : आज 7,486 जणांना डिस्चार्ज, सक्रिय रुग्णांची 80 हजार  

एमपीसी न्यूज – राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आज 7 हजार 486 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात सध्या 80 हजार 79 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 4 हजार 757 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 52 हजार 266 एवढी झाली आहे. त्यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17 लाख 23 हजार 370 एवढी झाली आहे.

 

 

राज्यातील एकूण मृतांची संख्या 47 हजार 734 एवढी झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.57 टक्के एवढा आहे तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.08 टक्के झाले आहे. नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणार रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला आहे.

राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर व नागपूर या जिल्ह्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दररोज होणा-या चाचण्यांचे प्रमाण वाढले असून त्या तुलनेत नव्याने वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सुधारत असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.