Today’s Horoscope 11 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार –  गुरुवार 11 मार्च 2021

 

  • शुभाशुभ विचार -वर्ज्य दिवस.
  • आज विशेष – महाशिवरात्री.
  • राहू काळ -दुपारी १.३० ते ३.००.
  • दिशा शूल -दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – धनिष्ठा २१.४५ पर्यंत,  नंतर शततारका.
  • चंद्र राशी – मकर ०९.२१ पर्यंत नंतर कुंभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- मरून)

पत प्रतिष्ठा वाढेल, आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाचा मान राहील. आज जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. व्यवसायात मर्यादित धाडस करायला हरकत नाही.

वृषभ – ( शुभ रंग- डाळिंबी )

कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर केवळ स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांना प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. दैव आज तुमच्या बाजूने आहे. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

कर्क –  ( शुभ रंग -गुलाबी)

वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरू नका. सासुरवाडी कडून आज काहीतरी लाभ संभवतो. गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

सिंह-  (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

इतरांच्या भानगडीत न डोकावता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्यास कमीपणा वाटण्याची गरज नाही.

कन्या – (शुभ रंग -चंदेरी)

कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवणे गरजेचे. हाती असलेल्या संधींचा सकारात्मकतेने वापर करा.

तूळ – ( शुभ रंग – राखाडी)

आजचा तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. गृहिणींना आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. देण्याघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या वेळीच पूर्ण कराल. ज्येष्ठांना मुलांकडून काही सुवार्ता येतील.

.

धनु –  (शुभ रंग- पिस्ता)

सामाजिक कामे करणाऱ्यांना समाजाकडून आदर प्राप्त होईल. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. गृहिणींना सासुबाईं कडून कौतुकाचे चार शब्द ऐकता येतील.

मकर – (  शुभ रंग- आकाशी)

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल, त्यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. पारिवारिक सौख्यात वृद्धीच होईल. आज बेकायदेशीर व्यवहार मात्र टाळा.

कुंभ – ( शुभ रंग – मोरपंखी)

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. झटपट लाभाच्या मोहातून मात्र फसवणूक होऊ शकेल सतर्क राहा.

मीन – (शुभारंभ- भगवा)

आपल्या लहरी व हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा. तुमची मते सगळ्यांनाच पटणार नाहीत. एखाद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढता येईल.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.