Pune Corona Update : रुग्णवाढ सुरूच, कोरोनाबाधितांनी 1300चा टप्पा ओलांडला; 646 रुग्णांना डिस्चार्ज

दिवसभरात 1352 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज : पुण्यात आज बुधवारी  (दि.10) दिवसभरात 1352 नवे रुग्ण सापडले. तर 646 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज एका दिवसात कोरोनाबाधितांनी 1300 चा  टप्पा ओलांडला आहे. 

आज कोरोनाबाधित 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  364  रुग्णांवर व्हेंटिलेटरवर   उपचार सुरू असून 721 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 11  हजार 521 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 7719 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4910  रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या   वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.