Today’s Horoscope 13 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – today’s Horoscope 13 November 2022
वार – रविवार.
13.11.2022.
शुभाशुभ विचार- चांगला दिवस
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ- सायंकाळी 04.30 ते 06.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा 10.18 पर्यंत नंतर पुनर्वसू.
चंद्र राशी – मिथुन.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
ऑफिस कामानिमित्त काही प्रवास घडू शकतात. बेरोजगारांना घराजवळ रोजगार मिळेल. आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस करा घराबाहेर वाद टाळलेले बरे.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )
आज तुमचे मनोबल उत्तम असेल कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेल्या गोष्टी तुम्ही शक्य करून दाखवाल. वाणीत गोडवा ठेवून आज तुम्ही विरोधकांची ही मने जिंकु शकाल.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल वरिष्ठांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतील. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे.

कर्क (शुभ रंग- जांभळा.)
आज घरातील वडीलधाऱ्यांच्या लहरी सांभाळाव्या लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणेच करायला हवेत. दूरच्या प्रवासात रात्री जागेच रहा.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )
आज काही मनाजोगत्या घटना घडतील नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र-मैत्रिणीच्या सहवासात आज दिवस आनंदात जाईल.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)
कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल. नोकरीच्या ठिकाणी आज साहेबांचे दडपण जाणवेल. आज आपल्या अधिकारांचा गैर वापर मात्र टाळा.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा अतिरेकही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)
कोणतीही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागायचेच.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुमच्या कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.

मकर ( शुभ रंग- लेमन )
आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी असतील तर आज मागायला लाजू नका प्रवासात सावध रहा.

कुंभ (शुभ रंग – लाल)
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येणार आहेत.

मीन -(शुभ रंग – लेमन )
शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय आज चांगले चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.