Lok Adalat: लोक अदालतीने मिटवला तब्बल 50 वर्षे जुना वाद

एमपीसी न्युज : खेड तालुक्यातील एक मोठा परिवार मानल्या जाणाऱ्या स्व. आ. सुरेशभाऊ गोरे यांच्या परिवारातील दोन-चार नव्हे तर तब्बल ५० वर्षांपासून सुरु असलेली जागेच्या वादातील न्यायालयीन लढाई लोक अदालतीमुळे संपुष्टात आली. या तडजोडीने विधी आणि न्याय क्षेत्रालाही सुखद धक्का बसला आहे.

Kartiki yatra:जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये देवस्थान कमिटीच्या वतीने कार्तिकी यात्रेच्या नियोजनासंदर्भातील आढावा घेण्यात आला

राज्याच्या विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी (दि. १२) खेड न्यायालयात लोकअदालत भरवण्यात आली होती. त्याअंतर्गत न्यायालयात १९७२ सालापासून सुरु असलेला तब्बल ५० वर्षे जुना खटला तडजोडीने सोडवण्यात आला. शेतीच्या आकारावरुन कै. नारायण मारुती गोरे, कै. देवराम मारुती गोरे, कै. नामदेव सोपाना गोरे, कै. गुलाब सोपाना गोरे , माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे, आणि सखाराम मलीभाऊ गोरे यांच्या परिवारात रोहकल येथील जमीन गट नंबर १२० , १२० आणि चाकण येथील काही जमिनीत मागील ५० वर्षांपासून वाद होता. खेड तालुक्यातील सर्वात मोठ्या परिवारातील एकत्र हिंदू कुटुंबातील गेली ५० वर्षांचा जमीन वाटपाचा वाद अखेर लोकन्यायालयात मिटवण्यात यश आले.

राजगुरुनगर येथील मुख्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजुरकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका दिवाणी न्यायाधीश म्हस्के व ॲड अजय पडवळ यांच्या पॅनलमध्ये सदरचा वाद तडजोडीने मिटवण्यात आला. ५० वर्षांचा जुना वाद मिटल्यानंतर वादी प्रतिवादी यांच्यातील जेष्ठ आणि तरुणांनी एकमेकांना पेढे भरून पुन्हा एकत्र येत समाजाच्या समोर आदर्श ठेवला आहे. हा खटला शनिवारच्या लोकअदालतीचे सर्वात मोठे यश म्हणून पुढे आला आहे. ५०वर्षांपूर्वीचा जमिनीच्या वादाचा खटला तडजोडीने निकाली काढल्याचे चित्र समाजाला आशादायी ठरेल असे या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. हा वाद मिटवा अशी स्व.आ. सुरेश गोरे यांची इच्छा असल्याचे देखील या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.