Today’s Horoscope 14 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – रविवार 14 मार्च 2021

 

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष — सामान्य दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
  • दिशा शूल -पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा
  • चंद्र राशी – मीन.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग -राखाडी)

आज स्वार्था कडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे होईल. महत्त्वाचे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका.

वृषभ – ( शुभ रंग – मरून )

आत्मविश्वासाने नवे उपक्रम राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. पैशाची मंदावलेली आवक पूर्ववत होईल.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहिल. नकारात्मक विचारांच्या लोकांना दूर ठेवा.

कर्क – (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. बिनचूक कामास प्राधान्य हवे. ज्येष्ठांनी उपासनेत खंड पडू देऊ नका.

सिंह- (शुभ रंग -चंदेरी)

आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. जरा डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन चालवताना डोक्यात विचारांची गर्दी नको. आज थोडी संयमाची कसोटी राहील.

कन्या – ( शुभ रंग- पांढरा)

आज नोकरीच्या ठिकाणी हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल.  थोडी चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. वैवाहिक जीवनात आज दोघात तिसरा येऊ देऊ नका.

तूळ – ( शुभ रंग – नारिंगी)

व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश निश्चित मिळणार आहे. आज तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.

वृश्चिक – ( शुभ रंग – सोनेरी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कामापुरतेच बोलणे हिताचे राहील.

धनु – ( शुभ रंग- निळा )

आज अथक परिश्रम यांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील.  काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल. सत्संगात रमाल.

मकर – ( शुभ रंग -आकाशी)

नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील. विनाकारण शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष घालू नका.

कुंभ – ( शुभ रंग -जांभळा)

अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून. परिवारात सामंजस्य राहील.

मीन – ( शुभ रंग- क्रीम)

आज वाणीत गोडवा ठेवून तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल. आर्थिक सुबत्ता येईल व तुमची कार्यक्षमता व कामातील उत्साह वाढेल. आज मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.