Today’s Horoscope 15 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – बुधवार

15-03-2023

शुभाशुभ विचार – प्रतिकूल दिवस

आज विशेष – सामान्य दिवस

राहू काळ – दुपारी 12 ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल

आजचे नक्षत्र- ज्येष्ठा 7.34 पर्यंत नंतर मूळ

चंद्र राशी – वृश्चिक 7.34 पर्यंत नंतर धनु

—————————————-

आजचे राशिभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- मरून )
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नास्तिक मंडळीही आज देवाला एखाद्या नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे तुमच्या मनात येईल. दैवाची साथ राहील.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)
व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ मिळेल. आज तुम्ही कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन ( शुभ रंग- लाल)
धंद्यातील रखडलेली येणी वसूल होतील. गोड बोलून आपल्या विरोधकांनाही तुम्ही आपलेसे कराल. जुनी दुखणी आज अंगावर काढू नका. विश्रांती ही गरजेची आहे.

कर्क (शुभ रंग- निळा.)
व्यावसायिक मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी आज तुम्हाला त्रस्त करतील. संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

सिंह (शुभ रंग- मोतिया )
कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना तारेवरची कसरत होणार आहे. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस अगत्याने करतील.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत करण्याचा प्रयत्न कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येतील.

Charholi News : चऱ्होली घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांवर ‘घर देता का घर’ म्हणण्याची वेळ

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)
आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. क्षुल्लक कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. आज जरा स्पष्ट वक्तेपणाला आवर झालेला हवा नाहीतर नाती दुरावतील.

वृश्चिक (शुभ रंग- मरून)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. घाईगर्दीत घेतलेले काही निर्णय चुकतील. हातचे सोडून पळत्या मागे धावाल.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधली तर सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरामोठ्यांच्या होला हो करा पण वाद वाढवू नका.

मकर ( शुभ रंग- गुलाबी)
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. आज तुम्हाला विविध प्रलोभने आकर्षित करतील.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या मात्र दुर्लक्षित होणार आहेत.

मीन -(शुभ रंग – निळा )
काही मनाविरुद्ध घटना घडतील. व त्यामुळे तुम्हाला नैराश्य येईल. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या दडपणात काम करावे लागेल. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे अति व्यस्त दिवस.

 

    शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.