Today’s Horoscope 16 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 April 2023- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

16.04.2023.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष -वरुथिनी एकादशी.

राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – शतकारका.

चंद्र राशी – कुंभ.

———————————

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल. तुमच्या कामातील तत्परता पाहून आज वरिष्ठ प्रभावित होतील. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )

नोकरीच्या ठिकाणी आता विरोधकांनाही तुमचे विचार पटू लागतील. अधिकार योग चालून येतील सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम करा. वडील आज तुम्हाला योग्य असले देतील.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी  )

नोकरी धंद्याच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचा मोह होणार आहे पण तसे करू नका. प्रलोभने टाळा. स्वतःवर संयम ठेवा.

कर्क (शुभ रंग- चंदेरी.)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकललेले बरे. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनशांती मिळेल.

सिंह (शुभ रंग- मरून )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपूनच करा. भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता )

नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील. आज तब्येत थोडीशी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर सौम्य होतील.

तूळ ( शुभ रंग- पांढरा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ मिळेल आज काही बिकट प्रश्न चुटकी सरशी सुटतील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. उत्साह पूर्ण दिवस

वृश्चिक (शुभ रंग- भगवा )

व्यापार उद्योगास सांगली गती येईल महत्त्वाच्या चर्चेत इतरांना आपली मते पटवून देऊ शकाल स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमी युगुलांनी आज मौन पाळणे हिताचे राहील.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्या. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

मकर ( शुभ रंग- मोतिया )

आज दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणे अनपेक्षितपणे वसूल होण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. आज प्रवासाची दगदग मात्र टाळा.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)

आज कार्यक्षेत्रात तुमचे नेतृत्व व वक्तृत्वही प्रभावी राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मुद्द्यावर ठाम राहणार आहात.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )

आर्थिक व्यवहारात सावध असणे आवश्यक आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्या शब्द देऊ नका. आधी स्वतःचा स्वार्थ बघा आज परमार्थ परवडणार नाही.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.