Todays Horoscope 16 February 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार बुधवार, दि. 16.02.2022

  • शुभाशुभ विचार – 10 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – मघसनान समाप्ती.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आश्लेषा 15.14 पर्यंत, नंतर मघा.
  • चंद्र राशी – कर्क 15.14 पर्यंत, नंतर सिंह.

—————————————-

आजचे राशीभविष्य.   

मेष ( शुभ रंग – राखाडी)

योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन केले तर यशाचा मार्ग सोपा होईल. कार्यक्षेत्रात थोडाफार विरोधकांचा उपद्रव वाढेल. आज गृहसौख्याचा दिवस. मोफत सल्ले देणारी माणसे बोअर करतील.

वृषभ – ( शुभ रंग – मरून )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. समाजिक कार्य करणाऱ्यांना समाजात आदर मिळेल.

मिथुन- ( शुभरंग- निळा )

पत प्रतिष्ठा वाढेल आज आप्तस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस.

कर्क- ( शुभ रंग- मोतिया )

कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. जोडीदारास दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल.

सिंह – (शुभ रंग- आकाशी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. हट्टीपणा सोडून आज संयमाने वागण्याची गरज आहे.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात आज रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. अहंकारास अजिबात थारा देऊ नका. हितशत्रू मित्रांमध्येच लपलेले आहेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळाल तर बरे.

तूळ- ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आपल्या कर्तुत्वास थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. वाणीत मृदुता हिताची राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. कार्यक्षेत्रात श्रमसफल्या चे समाधान मिळेल दैव आज तुमच्या बाजूने आहे. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील.

धनु – ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद चालायचेच. फार ताणून धरू नका.

मकर- ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा.

कुंभ- ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. आज आशादायी दिवस.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. आज तुमच्या कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा. व्यसनांपासून लांब राहा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.