Today’s Horoscope 17 November 2021; आजचे राशीभविष्य

आजचे पंचांग –
बुधवार.
१७.११.२०२१
शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – अश्विनी २२.४३ पर्यंत नंतर भरणी.
चंद्र राशी – मेष.
_______________________

मेष – ( शुभ रंग – पिस्ता )
एखाद्या महत्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल. वादविवादात आज आपल्याच मताशी ठाम रहाल.

वृषभ -(शुभ रंग- जांभळा)
काम धंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधारी मंडळी आज आपलेच खरे करतील. मोठ्या आर्थिक उलाढाली आज करूच नका.

मिथुन-( शुभ रंग- मोरपिशी)
आज पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. जीवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील. यशदायी दिवस आहे.

कर्क-( शुभ रंग -डाळिबी)
आपल्या सडेतोड बोलण्याच्या वृत्तीमुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरतांना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक कामे सोपी होतील.

सिंह-( शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. थोडा संयम ठेवा. गृहिणींना अति श्रमामुळे थकवा जाणवेल. भक्तीमार्गात असणार्‍यांना एखादी प्रचिती येईल.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

तूळ – (शुभ रंग- गुलाबी)
आजचा दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. दूरच्या प्रवासात थोडा खोळंबा होईल. मामा मावशी यांच्याकडून काही सुवार्ता येतील.

वृश्चिक-( शुभ रंग- राखाडी)
दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे मात्र डोक्याला मनस्ताप देतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.

धनु- ( शुभ रंग- क्रीम)
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास आवर्जून वेळ देतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील. उच्चशिक्षितांच्या महत्वाकांक्षा वाढतील.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुमध्ये एखादे धार्मिक करण्याचे बेत आखाल.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी.

मीन- ( शुभ रंग- मरून)
आज सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.