Today’s Horoscope 19 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार –  सोमवार. 19 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
  • आज विशेष – सूर्याला दवणा वाहणे.
  • राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र -पुनर्वसु.
  • चंद्र राशी –  मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग डाळिंबी)

आज एखादी महत्त्वाची बातमी तुमच्या कानी येणार आहे. काही जिवलग मित्रां बरोबर गेट-टुगेदर से बेत आखाल. आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाणार आहे. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

वृषभ – (शुभ रंग पिस्ता)

राशीच्या धनस्थानातून होणारे. चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल तुमची भाग्योदयाकडे वाटचाल होणार आहे. विरोधकांचा विरोध गोड बोलून थोपवून धराल.

मिथुन –( शुभ रंग- हिरवा)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील काम कमी व धावपळ जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजू नका. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील.

कर्क – ( शुभ रंग-निळा)

आज विलासी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते सतर्क राहा. सरकारी नियम तोडल्यास दंड चुकणार नाही. आपल्या मर्यादेत रहा.

सिंह –  ( शुभ रंग-मरून)

आज तुमची आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळी तुम्हाला मोठेपणा देतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

_MPC_DIR_MPU_II

कन्या –( शुभ रंग- आकाशी)

आज फक्त नाकासमोर चालणे हिताचे राहील. नीतीबाह्य  वर्तन अंगाशी येऊ शकेल. मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका. संध्याकाळी वेळेवर घर गाठणे हिताचे राहील.

तूळ – ( शुभ रंग -जांभळा)

कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या मिटिंग मध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. सुसंवाद साधून आज तुम्ही विरोधकांची ही मने जिंकु शकाल. कामगारांच्या कष्टांचे चीज होईल.

वृश्चिक –  (शुभ -रंग निळा)

भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. वैवाहिक जीवनात स्वतःच्या चुका शोधा.

धनु –  ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्हाला काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

मकर – ( शुभ रंग -मोरपंखी )

आज तुम्ही काही कामे निस्वार्थीपणे कराल. मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच असेल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्कीच मिळेल. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा.

कुंभ – ( शुभ रंग -चंदेरी)

काही रसिक मंडळी कामावर दांडी मारूनही आज थोडे करमणुकीस प्राधान्य देतील. प्रेम प्रकरणे सुसाट धावतील. काही भाग्यवान महिला हिरे, माणिक रत्ने खरेदी करतील.

मीन – ( शुभ रंग -मोतिया)

आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रश्न सोडवताना आईचा सल्ला आज अवश्य घ्या. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होणार आहे.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.