Todays Horoscope 22 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार शनिवार, दि. 22.01.2022

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष -साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – 10.88 पर्यंत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, नंतर उत्तरा फाल्गुनी
  • चंद्र राशी – सिंह 16.48 पर्यंत नंतर कन्या.

—————————————

आजचे राशीभविष्य-

मेष – (शुभ रंग- मोतिया)

आज रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका. व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागणार आहेत.

वृषभ- ( शुभ रंग -मोरपंखी)

नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामात काही अडथळे येतील. मुलं  अभ्यासाचा कंटाळा करतील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळू शकाल.

मिथुन -( शुभ रंग- सोनेरी)

आवक समाधानकारक असल्याने तुमची मनस्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. जोडीदाराची साथ अत्यंत मोलाची राहील. आईचे मन सांभाळा.

कर्क – (शुभ रंग- आकाशी)

आज मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग मित्र आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील. उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे आहे.

सिंह – ( शुभ रंग जांभळा)

नवीन व्यावसायिक मंडळींना यश दृष्टिक्षेपात येईल. आज कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते. शेजारी सलोखा वाढेल.

कन्या -( शुभ रंग – लाल )

कामगारांना ओव्हरटाइम करावा लागेल. आज काही देणीही चुकवावी लागतील. जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण कमी करणे गरजेचे.

तूळ -( शुभ रंग- पांढरा)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. कुटुंबियांस पुरेसा वेळ देता येईल. पूर्वी घेतलेल्या अचूक निर्णयामुळे काही लाभ पदरात पडेल.

वृश्चिक ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना आज वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.  मित्रांना दिलेला शब्द पाळणे कठीण जाईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

धनु – (शुभ रंग- केशरी)

आज शासकीय कामे रखडणार आहेत. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकला. नोकरीत वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील.

मकर – (शुभ रंग-तांबडा)

नवीन झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. कष्टाची कामे करणार्‍यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या चुका काढायची चूक करू नका.

कुंभ -( शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात करू शकाल. घरात आधुनिक सुख सुविधांसाठी हौशीने खर्च कराल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

मीन – (शुभ रंग- गुलाबी)

एखाद्या क्षुल्लक घटनेमुळे बेचैन    व्हाल. आज रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. तरुणांनी गैरवर्तन टाळावे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.