Today’s Horoscope 22 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – रविवार.

22.01.2023

शुभाशुभ विचार – चांगला दिवस

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- श्रवण. 

चंद्र राशी – मकर.


आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- जांभळा)

नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेस लागणार आहेत. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट करण्याची आज तुमची तयारी असेल.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूळ सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही अकस्मित अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी)

आज फक्त आपल्याच स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊच नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आज दिवस योग्य नाही. गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.

कर्क (शुभ रंग- निळा)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे उल्लंघन करू नका. सदैव सज्ज रहा.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक असणे आवश्यक आहे.

कन्या ( शुभ रंग- मरून)

आज तुमचा हाऊस मौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय आज चांगले चालतील. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

राहुल गांधींना पंतप्रधान बनावंच लागेल- संजय राऊत

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता होईल. आज आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करा.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल रिकाम टेकडी चर्चा आज वादास कारणीभूत होईल. शब्दांचा वापर जपून करा.

धनु- (शुभ रंग- क्रीम)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहजच उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या हसत मुखाने पार पाडतील. आनंदी दिवस.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी)

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)

खर्चाचे प्रमाण कितीही वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

मीन -(शुभ रंग – पांढरा)

तुम्ही पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

 

 

   शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.