Today’s Horoscope 23 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार 23 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00  ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुनर्वसु 22.45 पर्यंत नंतर पुष्य.
  • चंद्र राशी – मिथुन 16.30 पर्यंत नंतर  कर्क.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मोतिया)
व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील. कार्यक्षेत्रात काही फायदेशीर घडामोडी घडतील. तब्येत उत्तम राहील. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

वृषभ – (शुभ रंग – सोनेरी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचे विविध मार्ग खुणावतील. कार्यक्षेत्रात आज मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल.

मिथुन – (शुभ रंग – केशरी)
आज तुम्ही आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल, इतरांचे ऐकून घेण्याची तुमची मानसिकता नसेल. अति सडेतोड बोलण्याने तुमचेच काही मित्र दुरावतील.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)
रिकामटेकड्या गप्पांमध्ये आज तुमचा बराच वेळ फुकट जाईल. त्यामुळे महत्त्वाची काही कामे दुर्लक्षित होतील. हरवलेली एखादी वस्तू दुपारनंतर पुन्हा शोधली तर सापडेल. मित्रपरिवारात तुमच्या शब्दाचा मान राहील.

सिंह – (शुभ रंग- मरून)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. उच्चशिक्षिताना मनासारख्या नोकरांचे प्रस्ताव येतील.

कन्या – (शुभ रंग – डाळिंबी)
अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकला. शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)
कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गात काही अडथळे संभवतात. विरोधकांचा जोर वाढलेला आहे.  शारीरिक कष्टाची कामे करणार्‍यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)
आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

धनु – (शुभ रंग – जांभळा)
कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. आज विश्रांतीस ही प्राधान्य देणे गरजेचे आहे रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मकर – (शुभ रंग – गुलाबी)
आज घरात आधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. आज फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे.

कुंभ – (शुभ रंग – मोरपिशी)
आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. काही महत्त्वाच्या कामात मात्र विलंब होईल.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातून फक्त गैरसमज पसरतील. आज टेलिफोन व लाईट बिले भरावी लागतील. बेरोजगारांची वणवण चालूच राहील. शेजारी आपलेपणाने डोकावून बघतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.