Todays Horoscope 26 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार बुधवार, दि. 26.01.2022

  • शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.
  • आज विशेष – गणराज्य दिन.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – स्वाती 20.06  पर्यंत नंतर विशाखा.
  • चंद्र राशी – तुळ.

—————————————-

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- निळा ) 

कार्यक्षेत्र स्वतःचे वर्चस्व सिद्ध कराल. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस थारा देऊ नका.

वृषभ – (शुभ रंग – मोरपिशी )

रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी, अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात विरोधक तुमच्या चुका शोधत आहेत, काळजी घ्या.

मिथुन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

घरात आज आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. स्वप्नपूर्तीचा दिवस.

कर्क- ( शुभ रंग – चंदेरी )

सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आज गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांचे हट्ट स्वखुशीने पुरवाल.

सिंह- ( शुभ रंग- जांभळा )

तुमच्या एखाद्या नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामातही काही अडथळे संभवतात. गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील.

कन्या- (शुभ रंग- पांढरा )

आज रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवणे हिताचे. प्रवासात खूपच दगदग होईल.

तूळ- ( शुभ रंग- भगवा )

आज वादविवादात तटस्थ राहा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.

वृश्चिक- ( शुभरंग- पिस्ता )

आज काही बिले भरावी लागतील. काही अत्यावश्यक देणीही चुकवावी लागतील. हौस मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. आज कुवती बाहेर जबाबदाऱ्या अजिबात स्वीकारू नका. थोरांचे सल्ले विचारात घ्या.

धनु- ( शुभ रंग – आकाशी )

वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. संततीकडून सुवार्ता येतील. जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतून लाभ पदरी पडेल.

मकर- ( शुभ रंग- राखाडी )

कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. आज मित्रांना दोन हात लांब ठेवणे हिताचे आहे.

कुंभ – (शुभ रंग- तांबडा )

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच केलेली बरी. गृहिणींचा आज    देवधर्माकडे ओढा असेल व देवही आज नवसास पावेल. अधिकारी वर्गाने अधिकारां पेक्षा कर्तव्याचा विचार केलेला बरा.

मीन – ( शुभ रंग – केशरी )

नव्यानेच   झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. वैवाहिक जीवनात थोडीफार तू तू मैं मैं होऊ शकते.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.