Today’s Horoscope 27 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  शनिवार, ​दि​.27 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष -माघ स्नान समाप्ती.
  • राहू काळ – सकाळी 9:00 ते 10:30
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र — मघा 11.17 पर्यंत नंतर पूर्वाफाल्गुनी.
  • चंद्र राशी – सिंह.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- पिस्ता)

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.

वृषभ – (शुभ रंग – मरून)

आज तुम्हाला कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावाच लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. काही जागा विषयक प्रश्न सुटतील, प्रेम प्रकरणात मात्र नसती आफत होईल.

मिथुन – (शुभ रंग – राखाडी)

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आजचा  दिवस धावपळीत जाईल, एखाद्या अनुकूल घटनेने आत्मविश्वास वाढेल.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज धनस्थानी होणारे चंद्रभ्रमण आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. दीर्घकाळ रखडलेल्या योजना मार्गी लागतील. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अति स्पष्ट बोलून काही जवळची नाती दुखावू नका.

सिंह – (शुभ रंग – हिरवा )

भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. घरात काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग- भगवा)

आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहतील. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. पासपोर्ट विजा विषयक कामे यशस्वी होतील. देण्याघेण्याचे व्यवहार सतर्कतेने करा.

तूळ – ( शुभ रंग- नारिंगी)

नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज सर्वच दृष्टीने अनुकूल असलेला दिवस सत्कारणी लावा.

वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. आज गप्पांपेक्षा  कृतीवर भर द्या. मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका.

धनु – ( शुभ रंग – मोरपंखी)

वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. देव धर्म दान धर्म इत्यादी गोष्टींकडे आज तुमचा कल असेल. घरातील थोरांचे आशीर्वाद मिळवाल.

मकर – ( शुभ रंग- आकाशी)

व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. स्वतःच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या.

कुंभ – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आज स्वावलंबन महत्वाचे राहील. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. जवळच्या मित्रांमध्ये वितुष्ट संभवते. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.