Today’s Horoscope 28 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 February 2023
वार – मंगळवार
28.02.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी 7.20 पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ 20.32 पर्यंत नंतर मिथुन.
—————————————-
मेष (शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज दुरावलेली नाती जवळ येतील.

वृषभ (शुभ रंग – मोतिया)
आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलण्याने नात्यात गैरसमज निर्माण होतील. कुणाला मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका.

मिथुन (शुभ रंग – तांबडा)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. आज एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

कर्क (शुभ रंग – पिस्ता)
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. आज रात्रीच्या प्रवासात बेसावध राहू नका.

सिंह (शुभ रंग – लाल)
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. हाती असलेला पैसा जपून वापरावा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

कन्या (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना नाईलाजाने मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधावा.

तूळ (शुभ रंग – जांभळा)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेले आहेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

वृश्चिक (शुभ रंग – पांढरा)
केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीही गरजेची आहे.

धनु (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द जपून वापरायला हवेत.

मकर (शुभ रंग – तांबडा)
दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होईल आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीचे मनावर घेतील. कला क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. खेळाडूंनी सराव वाढवावा.

मीन (शुभ रंग – भगवा) Today’s Horoscope 28 February 2023
वास्तु व वाहन खरेदीचे व्यवहार आज टाळले तर बर होईल. गृहिणींना आज माहेरीची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच अधिक रमतील. शेजारी प्रेमाने डोकावून जातील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Maharashtra : शहरानंतर आता संपूर्ण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखला जाणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.