Today’s Horoscope 29 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – गुरुवार. 29 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार — 12 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अनुराधा 14.29 पर्यंत नंतर जेष्ठा.
  • चंद्र राशी –  वृश्चिक.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

आज तुम्हाला काही गोड बोली माणसे भेटतील. देण्यघेण्याच्या व्यवहारात सतर्क राहा. प्रलोभनांना अजिबात बळी जाऊ नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस.

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन – ( शुभ रंग – चंदेरी)

आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. नोकरीत काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होणे केवळ अशक्य.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्हाला रुटीन कामाचा कंटाळा येईल. आपल्या कर्तव्या पेक्षा मौजमजा करण्यास प्राधान्य द्याल. बरेच दिवसानी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. विलासी वृत्ती बळावेल.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज घरात आर्थिक सुबत्ता येईल. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले काही निर्णय मात्र कदाचित चुकण्याची शक्यता आहे. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवेल.

कन्या – ( शुभ रंग – मरून)

आज काही अति हुशार मंडळी तुमच्या संपर्कात येतील.  रिकामटेकड्या चर्चेत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ढळू देऊ नका.

तूळ – ( शुभ रंग – निळा)

वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. आज शेजाऱ्यांशी काही मतभेद संभवतात. आज केवळ गाप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्या. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – क्रीम)

आज अति धावपळ टाळा. हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क ला प्राधान्य देणे हिताचे राहील. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येणार आहेत. वेळेचे नियोजन महत्त्वाचे राहील.

धनु – (शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू काहीसा डळमळीत होण्याची शक्यता आहे. काही दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपल्या मौल्यवान वस्तूची आज काळजी घ्या.

मकर – ( शुभ रंग – मोरपंखी)

वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. विद्यार्थ्यांकडून आज कौतुकास्पद कामगिरी होईल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.

कुंभ – ( शुभ रंग – मोतिया)

व्यवसायात काही नवे करार यशस्वी होतील. यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. ज्येष्ठांना प्रकृती उत्तम साथ देईल.

मीन – ( शुभ रंग- जांभळा)

नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही विनंती करायची असेल तर आजचा दिवस योग्य नाही. आज एकांताची गरज भासेल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment