Today’s Horoscope 9 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार…  सोमवार. ,….. ​दि​. 9 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –क्षय दिन.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी ०७.३० ते ०९.००.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – ०८.४२ पर्यंत आश्लेषा नंतर मघा.
  • चंद्र राशी – कर्क ८.४२ पर्यंत नंतर सिंह.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- मरून )

आज तुमचा फक्त ऐश आराम करण्याकडे कल राहील. संध्याकाळी एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. सहकुटुंब चैन करून बच्चे कंपनीस खुश कराल.

वृषभ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्या गृहसौख्यात वृद्धीच होणार आहे. वाहन वास्तु विषयी खरेदी-विक्री फायद्यातच राहील. कलाकारांना मात्र प्रेक्षकांची वाट पहावी लागेल.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका आज स्वावलंबन महत्त्वाचे आहे.

कर्क – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. योग्य हितसंबंध निर्माण होतील. खर्चास आवर घालून पुरेशी बचत करता येईल. काही येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

सिंह- ( शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही महत्वाच्या चर्चेत अग्रेसर असाल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुती नेही भारावून जाल. तुमच्या हातून जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी होईल.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. सहकुटुंब प्रवास घडतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखाद्या सुरक्षित गुंतवणुकीचा ही विचार कराल

_MPC_DIR_MPU_II

तूळ  – ( शुभ रंग- पांढरा)

नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. अर्धवट बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. तुमच्या काही अपुर्‍या स्वप्नांची पूर्तता होईल. गृहलक्ष्मी व मुले प्रसन्न असतील.

वृश्चिक ( शुभ रंग- नारिंगी)

आज तुम्हाला महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा सहवास लाभेल. ध्येयपूर्ती कडे वेगाने वाटचाल होईल. आज एखाद्या जिवलग मित्रास यथाशक्ती मदत करणार आहात.

धनु  – ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीला नशिबाची उत्तम साथ मिळेल.

मकर – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज पोट बिघडेल खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. बेकायदेशीर कृत्य अंगाशी येऊ शकतील, त्यामुळे नाकासमोर चालावे.

कुंभ  – ( शुभ रंग – गुलाबी)

जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. आज तुम्ही इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.

मीन ( शुभ रंग- पिस्ता)

बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील  ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी जास्त दगदग टाळावी.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1