Todays Horoscope 23 November 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – मंगळवार, 23.11.2021

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – अंगारक चतुर्थी. (चंद्रोदय 20.53)

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – आर्द्रा 13.44 पर्यंत नंतर पुनर्वसु.

चंद्र राशी – मिथुन.

______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील.  अपेक्षित मेल्स येतील. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार उद्या वरच ढकला. मातोश्रींच्या हो ला हो करून विषय संपवा.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

सर्व लहान मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरित्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, पण तुम्ही लक्ष देऊ नका.

मिथुन- ( शुभ- रंग क्रीम)

नोकरी धंद्याच्या ठिकाणी आज अहंकारास थारा देऊ नका. मृदू वणीने अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. गृहिणी एखादा विवाह जमवण्यात यशस्वी मध्यस्थी करतील.

कर्क – ( शुभ रंग- तांबडा)

आज घरातील थोरांशी मतभेद संभवतात, पण फार ताणू नका. त्यांच्या वयाचा मान राखायला हवा. दूरच्या प्रवासात आज आपला मौल्यवान ऐवज सांभाळा.

सिंह- ( शुभ रंग – सोनेरी)

नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आज अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या धंद्याची सुरुवात करण्यास आज योग्य दिवस.

कन्या – ( शुभ रंग – भगवा)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला राहील.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज भासेल.

तूळ – (शुभ रंग- आकाशी)

कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ निश्चित मिळेल. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.

वृश्चिक- ( शुभ रंग – पांढरा)

आज तुम्ही आधी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.

धनु- ( शुभ रंग – केशरी)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढणार आहे. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. आज आशादायी दिवस.

मकर- ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. आज सकाळी साहेबांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. रुग्णांनी डॉक्टरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.

कुंभ-( शुभ रंग- मोरपंखी)

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. आनंदी दिवस असून आजची संध्याकाळ प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात व्यतीत कराल.

मीन – ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. गृहिणींना गृहोद्योगातून चांगली कमाई होणार आहे. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.