Maval News: मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भारत काळे तर सचिवपदी चंद्रकांत लोळे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पवनानगर येथील ‘सकाळ’चे बातमीदार भारत काळे यांची निवड करण्यात आली आणि सचिवपदी ‘लोकमत’चे बातमीदार चंद्रकांत लोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष विजय सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी सुदेश गिरमे, ज्ञानेश्वर वाघामारे, गणेश विनोदे, साम टीव्हीचे दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी पुढीलप्रमाणे

उपाध्यक्ष : सचिन शिंदे ,संकेत जगताप

सचिव:  चंद्रकांत लोळे 

खजिनदार : सचिन ठाकर

पत्रकार परिषद प्रमुख : केदार शिरसट

प्रसिद्ध प्रमुख : निलेश ठाकर 

प्रकल्पप्रमुख : संजय हुलावळे

संचालक :ज्ञानेश्वर ठाकर, रामदास वाडेकर,प्रभाकर तुमकर, रवि ठाकर ,दत्ता म्हाळस्कर, नितिन तिकोणे ,शिवानंद कांबळे, किशोर ढोरे

सदस्य : दिनेश टाकवे,दक्ष काटकर,सुभाष भोते,योगेश घोडके,बाबुराव काळे,उत्तम ठाकर,भारती गायकवाड, अभिषेक बोडके,सागर शिंदे,प्रसाद कुटे,संतोष कदम,चंद्रकांत असवले,

यावेळी दिलीप काबंळे, रवी ठाकर, सुभाष भोेते, दक्ष काटकर, बाबुराव काळे, उत्तम ठाकर, अभिषेक बोडके,प्रसाद कुटे, सागर शिंदे हे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी निवडीनंतर बोलताना भारत काळे म्हणाले की, सर्वांना एकत्रित घेऊन पत्रकारितेमध्ये येणाऱ्या समस्या व सोशल मिडियाच्या काळात आधुनिकतेची जोड देत आपण पत्रकार संघाचे काम वाढविण्यासाठी प्रयत्न करू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.