Nigdi News : वाहतूक जनजागृती अभियानाअंतर्गत मोटरसायकल रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत आज दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता वाहतूक नियंत्रण शाखा निगडी आणि KTTF यांच्या संयुक्त विद्यमाने (Nigdi News) वाहतूक जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे.  या अंतर्गत भक्ती शक्ती चौक येथून मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले. या रॅलीला वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजया कारंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि जनजागृतीची ही रॅली सुरू झाली.

KTTF चे अध्यक्ष अशोकभाऊ तनपुरे यांनी रॅलीला संबोधित केले तिथून रॅली निघाल्यानंतर निगडी मुख्य बस स्टॉप, खंडोबा माळ, तसेच टिळक चौक तेथून लोकमान्य हॉस्पिटल निगडी, कॅम्प एज्युएशन सोसायटीचे वरिष्ठ महाविद्यालय ,भेळ चौक, म्हाळसाकांत महाविद्यालय, अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा यासंदर्भात जनजागृतीचे कार्य वाहतूक नियंत्रण शाखा निगडी यांचे तर्फे करण्यात आले.

Bhosari Murder : पत्नीचा खून करणारा पती 27 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

या रॅलीमध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस सबइन्स्पेक्टर राऊत आणि अनेक पोलिस बांधव आणि KTTF चे सुमारे 125 सदस्य सहभागी झाले होते. रॅली ची सांगता निगडी वाहतूक विभाग येथे करण्यात आली. ही रॅली यशस्वी झाल्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजया कारंडे मॅडम यांनी संबोधित केले. (Nigdi News) या प्रसंगी KTTF चे कार्याची माहिती सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी सांगितली. अध्यक्ष अशोक तनपुरे यांनी सर्वांचे आभार मानले. रॅली चे नियोजन कार्याध्यक्ष विजयकुमार अब्बड आणि महिला अध्यक्षा अमृता वैद्य यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.