Pune – महिला वाहतुक पोलीसाचा विनयभंग करणारा अटकेत

एमपीसी न्युज – वाहतुकीचे नियम मोडून वाहतूक शाखेतील महिला नाईकाशी अपशब्द वापरून विनयभंग करणाऱ्या  आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना काल (दि.20) रात्री 11च्या दरम्यान महात्मा फुले चौक, मुंढवा येथे घडली.

रवि अशोक सरतापे (वय 32, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हडपसर वाहतूक शाखेत कार्यरत असून त्या मुंढवा येथील महात्मा फुले चौकात वाहतूक नियमन करत असताना आरोपी रवि हा चुकीच्या दिशेने येत असल्याने फिर्यादी महिलेने त्याला थांबवले. दरम्यान रविने त्याला थांबवल्याच्या कारणावरून महिलेचा अपशब्द वापरून, शिवीगाळ करून व आरडा-ओरडा करून तसेच त्यांना धमक्या देऊन विनयभंग करत कामात अडथळा निर्माण केला.

रवी सरतापे याला अशा उद्धट आणि बेजबाबदार वागणुकीमुळे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याने पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.