Chinchwad : पुणे-मुंबई महामार्गावर अपघात; वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव वेगात जाणारा ट्रक समोरच्या ट्रकला धडकला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड येथील जयश्री टॉकीजच्या समोर घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नाही.

सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव नलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरून गॅस भरलेला ट्रक जात होता. चिंचवड येथील जयश्री टॉकीजसमोर ट्रक आला असता मागून भरधाव वेगात आलेलय हायवा ट्रकने धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. दरम्यान महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातातील दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. ट्रकचालकाला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.