Pimpri : एका दिवसात वाहनचोरीचे पाच गुन्हे दाखल; वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवसात पाच वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन, निगडी, वाकड आणि भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रीतम नितीन गांधी (वय 25, रा. शिंदेनगर, बावधन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी घराच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली 90 हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 ही बुलेट अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी रात्री घडली. तसेच चेतन रामजी जेस्वाल (वय 25, रा. शनिमंदिर रोड, वाकड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी रविवारी रात्री घराजवळ पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदनसिंग त्रिकोलसिंग मेहरा (वय 33, रा. समर्थनगरी, निगडी) गुरुवार (दि. 9) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी मधील हॉटेल रायगड येथे जेवणासाठी गेले होते. हॉटेलच्या बाहेर त्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 44 / जी एम 5925) पार्क केली. रात्री साडेबाराच्या सुमरास जेवण संपवून घरी जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर आले असता त्यांची दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी नव्हती. सर्वत्र शोधाशोध केली, मात्र दुचाकी न मिळाल्याने सोमवारी (दि. 20) निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्पटे वस्ती येथे सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली 40 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / जी जे 8341) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 19) रात्री घडला. याप्रकरणी शामा सुभाष बर्नाड (वय 19, रा. के 406, डायनॅस्टी सोसायटी, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवार वस्ती दापोडी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली मोटारसायकल मंगळवार (दि. 14) रोजी रात्री सात ते नऊच्या दरम्यान चोरून नेली. याप्रकरणी मयूर अरविंद अहिरे (वय 32, रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

वरील सर्व गुन्हे सोमवारी (दि. 20) दाखल करण्यात आले आहेत. वाढती वाहनचोरी पोलिसांची डोकेदुखी तर बनणार नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.