Pune news: शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर; पुण्याची जबाबदारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. पुणे जिल्ह्याची जबाबदारी परिवहन, संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे. सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री होऊन पुढील महिन्यात ठाकरे यांना एक वर्ष होत आहे. राज्य चालवताना संघटनेकडे दुर्लक्ष होऊ शकतात यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचा कटाक्ष असतो. जिल्हाप्रमुख यांच्याशी ते संवाद साधत असतात. आता
संपर्कमंत्री जाहीर केले आहेत.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहर, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (चंद्रपूर, गोंदिया), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (कोल्हापूर, सातारा), कृषिमंत्री दादा भुसे (नाशिक, नगर), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (बुलढाणा, अमरावती), परिवहनमंत्री अॅड. अनिल परब (पुणे, रायगड), जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (सोलापूर, सांगली), वनमंत्री  संजय राठोड (नांदेड, भंडारा-नागपूर), फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (बीड, लातूर). महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (नंदूरबार, वर्धा), गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (हिंगोली, परभणी)ची जबाबदारी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III