Baby leopard : जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात उसाच्या शेतात सापडलेल्या तीन बछड्यांचे व आईचे मिलन

एमपीसी न्यूज : जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात ऊसाच्या शेतात सापडलेल्या 3 बिबट्यांच्या बछड्यांना वन विभागाने व वाइल्डलाईफ एसओएस च्या टीमने (Baby leopard) मादी बिबट्याकडे दिले आहे.वन विभागाने व वाइल्डलाईफ एसओएस च्या टीममुळे आई आणि बछड्यांचे अखेर मिलन झाले आहे.

गुरुवारी 60 दिवस वय असलेले 3 बछडे ऊस शेतात शेतकऱ्यांना दिसले. हे बिबट प्रवण क्षेत्र असल्याने येथील शेतकऱ्यांना माहिती असते की, त्या बछड्यांची आई जवळच असणार. त्यामुळे त्यांनी लगेच वन विभागाला याबाबत कळवले.

वन विभागाने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र च्या वाइल्डलाईफ एसओएस च्या टीमला ही कळवले होते. या टीमला प्राथमिक तपासणीत कळाले की, ते बछडे 60 दिवस वयाचे आहेत. त्यामधील एक नर व दोन मादी बिबटे आहेत.

Two wheeler theft : घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

रात्रीचे बिबटे सक्रिय असतात. त्यामुळे टीमने रात्री त्या बछड्यांना एका बॉक्स मध्ये शेतात ठेवले. शुक्रवारी पहाटे टीमचे सदस्य तेथे गेल्यावर त्यांना बछडे दिसले नाहीत.(Baby leopard) त्यांनी तेथे लावलेल्या ट्रॅप कॅमेरयाच्या फूटेज मधून कळाले की, त्या बछड्यांची आई त्यांना तिच्या सोबत घेऊन गेली.

डॉ. चंदन सवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, वाईल्डलाईफ एसओएस म्हणाले की, “आम्ही त्या बछड्यांची वैद्यकीय तपासणी केली. ते सर्व स्वस्थ होते.(Baby leopard) तसेच त्या बछड्यांमध्ये मायक्रो चिप बसविण्यात आली. ह्या चिपमुळे आपण त्या बिबट्यान्ना ओळखू शकतो. तसेच त्यांच्या वास्तव्याबाबत माहिती कळते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.