Two wheeler theft : घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – मेदनकरवाडी येथील एका घराच्या पार्किंग मधून (Two wheeler theft) दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार शनिवारी (दि. 12) पहाटे उघडकीस आला.

एकनाथ रामा लोखंडे (वय 46, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Mobile theft : पादचारी मजुराचा मोबाईल हिसकावला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 /एफवाय 7451) त्यांचे जावई सागर चिंतामण शिंदे यांच्या घराच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती.(Two wheeler theft) शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.