Mobile theft : पादचारी मजुराचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या मजुराचा मोबाईल फोन एका महिलेने हिसकावला.(Mobile theft) ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्री ओटास्किम निगडी येथे घडली.

नसीम सादीक शेख (वय 30, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 50 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon-Chakan : तळेगाव-चाकण महामार्गावरील वाहतूक समस्या महिना अखेरपर्यंत सोडविणार,प्रशासनाचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅटरिंगचे काम करतात. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता काम संपवून ते पायी चालत घरी जात होते. (Mobile theft) त्यावेळी आरोपी महिलेने फिर्यादींचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.